आमच्या विषयी | |||
मिलन क्रिडा मंडळ या सामाजिक संस्थेची स्थापना सन १९९३ साली करण्यात आली व तेव्हापासून सार्वजनिक श्री गणेशोत्सवाचे आयोजन सिमला नगरच्या छोट्याशा गल्लीत करण्यात येत होते आणि सन २००९ पासून हा उत्सव भव्य व दिव्य जागेत मलबार अपार्टमेंट गेटजवळ, सिमला हाऊस, गणेश चौक, नेपियन सी रोड , मलबार हिल , मुंबई क्र. ३६ येथे साजरा करण्यात येत आहे. थोर समाजसुधारक व स्वातंत्र सेनानी लोकमान्य टिळक यांना अभिप्रेत असणाऱ्या सार्वजनिक श्री गणेशोत्सवाची संकल्पना पूर्ण करण्याचा प्रयत्न मंडळ करीत आहे. मंडळाने स्थापनेपासून ते आजतागायत अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडलेले आहेत याची दाखल मुंबईतील अनेक वर्तमानपत्राने त्यांच्या वर्तमानपत्रात प्रसिद्धीद्वारे घेतली आहे. आपल्या महितीसाठी, मंडळाच्या गणेशमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची जागा वास्तुशास्त्राप्रमाणे शुभ व पवित्र असून दरवर्षी श्री गणेश मुख्य चौकातील रस्त्यांच्या केंद्रीय जागी पवित्र वृक्षांच्या गर्द छायेखाली विराजमान होतात. या परिसरात श्री संतोषीमातेचे एकमेव जागृत मंदिर देखील आहे, हा एक योगायोग आहे असे भाविकांना वाटते. मंडळाची गणेशमूर्ती भारतातील गणेशमूर्तीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या पेण, जिल्हा – रायगड येथील मूर्तिकारानी साकार केलेली असते. ही आकर्षक मूर्ती पाहण्यासाठी व दर्शनासाठी भक्तगण लीन होताना दिसतात. अनेक भक्तांचे नवस पूर्ण होत असल्याकारणाने सर्वधर्मीय भाविकांची गर्दी गणेश मंडपाकडे वर्षानुवर्षे वाढत आहे. |
![]() |
![]() |
![]() |
संस्थापक/जनरल सेक्रटरी |
अध्यक्ष |
खजिनदार |
![]() |
![]() |
![]() |
उपाध्यक्ष |
उपसेक्रेटरी |
उपखजिनदार |
![]() |
![]() |
![]() |
सदस्य |
सदस्य |
सदस्य |