संस्थापकीय | |||
![]() |
|||
प्रशांत जाधव (संस्थापक) | |||
मोबईल नं . :८३६९६७८२४१, ९९६७३८५२९९ | |||
प्रिय बंधु आणि भगिनींनो, आपणास कळविण्यात आनंद होतो की, मिलन क्रिडा मंडळाची स्थापना सन १९९३ मध्ये माझ्या वयाच्या १८व्या वर्षी माझ्या निवडक मित्रमंडळींच्या सहकार्याने करण्यात आलीव सन १९९६ साली मंडळाची धर्मादाय आयुक्त कार्यालयात रीतसर नोंदणी करण्यात आली. त्यानंतर मंडळाने अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले व त्याचे फलित म्हणून सन २००९ मध्ये सदर मंडळाला आयकर विभागा कडून 80G ट्रस्ट म्हणून मान्यता प्राप्त झाली. हे मंडळ दिवसेंदिवस सामाजिक कार्यांच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहोचत आहे. आपणास मी सांगू इच्छितोकी, उपरोक्त मंडळाच्या माध्यमातून १९९३ पासून सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाच्या अनुषंगाने निरनिराळे वैद्यकीय शिबिरे उदा. मोफत आयुर्वेदिक शिबीर व औषधवाटप, निरनिराळ्या रक्तचाचण्या, मोफत कॅन्सर तपासणी, मोफत नेत्र तपासणी व चष्माशिबीर, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया इ. आरोग्य शिबिरांचे तसेच ५००० भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. सन २००० पासून यशस्वीरीत्या “रक्तदान शिबीर” या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून सामाजिक बंधुभाव वृद्धीगत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मंडळ सातत्याने करीतआहे. लहानमुलांसाठी, प्रौढांसाठी व महिलांसाठी निरनिराळ्यास्पर्धा, दरवर्षी किमान १००० गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्यावाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारसोहळा, वृक्षारोपण तसेच सरकारी योजनांचे शिबीर उदा. जेष्ठनागरिक ओळखपत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड व मतदारनोंदणी इ. यशस्वी आयोजन मंडळातर्फे करण्यात येते. |